शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज…

कृषी पर्यवेक्षक योगेश देशमाने यांचे प्रतिपादन

वैभववाडी संजय शेळके
रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील जिवाणू ,पोषक घटक नष्ट होत असल्यामुळे जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक योगेश देशमाने यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सौ स्नेहा शेळके, तलाटी माळी मॅडम, मार्गदर्शक कृषी महाविद्यालय सांगुळवाडी चे प्राचार्या बी डी पाटील, आदर्श शेतकरी मंगेश कदम, तंटामुक्ती अध्यक्ष विलास रावराणे, ग्रामपंचायत सदस्य महेश रावराणे, दिगंबर गुरव, सोसायटी चेअरमन संभाजी रावराणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव कृषी सहाय्यक दीपक मसेकर, सांगुळवाडी ग्रामसेवक विद्याधर सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, ग्रामसेवक अनिल गुघे,आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगेश कदम म्हणाले शेती करताना घेणाऱ्या पिकाचे योग्य प्रकरण नियोजन करून त्याच्या खताचे नियोजन करावे शेतीत येणारा खर्च कमीत कमी कसा करता येईल याकडे शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजे खर्च कमी आणि उत्पादन जास्त त्याची सांगड घालणे अतिशय गरजेचे आहे.
तसेच आपण सेंद्रिय खताचा वापर केल्यास आपणास अनेक फायदे आहेत जमिनीची सुपीकता वाढून पोषक घटक वाढतात त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन त्यास बाजारभाव चांगला मिळतो असे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ पाटील, ग्रामसेवक विद्याधर सावंत मार्गदर्शन केले आभार ग्रामसेवक अनिल गुघे यांनी मानले.

You cannot copy content of this page