कलंबिस्त येथे तालुका स्तरीय शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.१४-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कलंबिस्त येथे तालुका स्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सेंद्रिय शेती ही काळाची गरज ओळखून सेंद्रिय शेतीबाबत प्रोत्साहन देऊन सेंद्रिय शेतीविषयक सखोल मार्गदर्शन तसेच मसाला पिके लागवड ,प्रक्रिया प्रकल्प या विषयी माहीती देऊन शेतक-यांशी संवाद साधून शंकांचे निरसन करून विविध योजनांचा लाभ घेण्याविषयी आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी श्री. आडसुळे यानी केले.

कृषि विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती मंडळ कृषि अधिकारी सावंतवाडी श्री.एस.बी.देसाई यानी दिली.प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन जिल्हा समन्वयक श्री.प्रताप चव्हाण यानी केले.तसेच भात पिकावरील किडी व रोग नियंत्रण या विषयी सखोल मार्गदर्शन कृषीपर्यवेक्षक श्री.यशवंत गव्हाणे यानी केले.

कृषि विभागाच्या विविध योजना व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतीमध्ये प्रगती करण्याचे आवाहन कलंबिस्त सरपंच श्री.शरद नाईक यानी केले.यावेळी कलंबिस्त उपसरपंच श्री.नामदेव पास्ते,कृषीसहायक्क सी.सी.रेडकर,स्वप्नील शिर्के,एन.के साखरे,ए.आर.खराडे,एस.ए.घेरडे,एस.एस.निकम तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सगुण पास्ते ,सह्याद्री शेतकरी गटाच्या अध्यक्षा कविता देसाई,अन्नपुर्णा शेतकरी गटाच्या अध्यक्षा रश्मी गवस,सामाजिक कार्यकर्ते अशोक राऊळ,शाहू पास्ते,चंद्रकांत सावंत,कृष्णा देसाई,राघो सावंत,सुरेश तावडे,उदय सावंत,तसेच महिला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन कृषीसहायक्क सी.एल.राऊळ ,आभार मंडळ कृषिअधिकारी एस.बी.देसाई यानी मानले

You cannot copy content of this page