मीर यांच्या अभ्यासात्मक प्रकल्पाला प्रथम क्रमां

⚡वेंगुर्ला ता.१४-: सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या एसटीपी व ईटीपी प्रोजेक्ट स्पर्धेत मे. दिशा एनव्हायरो केअर आणि प्रो.साकीब मीर (वेंगुर्ला) यांनी मांडलेल्या अभ्यासात्मक प्रकल्पाला रोख दहा हजार व मानपत्र असे प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य सरकारकडे पुढील राज्य स्पर्धेसाठी पाठविण्यात आला.

  राज्यस्तरीय स्पर्धेत साकीब मीर निश्चितच प्रथम क्रमांक मिळवतील असा विश्वास सावंतवाडी प्रांताधिकारी यांनी व्यक्त केला. प्रा.साकीब मीर हे उच्च विद्या विभूषित असून राज्य केंद्र पोलूषन बोर्डात त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. यावेळी सावंतवाडी मुख्याधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

फोटोओळी – अभ्यासात्मक प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सावंतवाडी प्रांताधिकारी यांनी प्रा.साकिब मिर यांचा गौरव केला.

You cannot copy content of this page