माजी आदर्श शिक्षिका कल्याणी कांबळी मॅडम यांच्या हस्ते मर्डे ग्रामपंचायतचे ध्वजवंदन…

मर्डे सरपंच संदीप हडकर आणि सर्व सदस्यांचा स्तुत्य उपक्रम;मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने कांबळी मॅडम यांचा भव्य नागरी सत्कार…

⚡मालवण ता.१४-: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मर्डे ग्रामपंचायत ध्वजवंदन मसुरे येथील माजी आदर्श शिक्षिका कल्याणी कांबळे यांच्या शुभहस्ते करून मर्डे सरपंच संदीप हडकर उपसरपंच पिंट्या गावकर , ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर आणि सर्व सदस्यांनी एक अनोखा उपक्रम घडवून आणला मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला

मसुरे केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी शिवराज सावंत यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका कांबळी मॅडम यांचा त्यांच्या आज वरच्या कार्याचा गौरव म्हणून मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच पिंट्या गावकर ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, पप्पू मुळीक, सचिन पाटकर,श्री सावंत, मंडल अधिकारी श्री चव्हाण, मसुरे केंद्रप्रमुख श्री देशमुख,श्री गावडे सर,विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर , शामा सावंत, नरेन हिंदळेकर, हेमलता दुखंडे, महेश खोत, आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती कांबळी यांनी मर्डे ग्रामपंचायत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज मला जो मान दिला आहे हा माझ्या जीवनातील अतुलनीय असा प्रसंग आहे. माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा मला नेहमीच सार्थ अभिमान असल्याचे सांगितले तर सरपंच संदीप हडकर यांनी आज या मसुरे गावच्या सर्वांना गुरूतुल्य असलेल्या माझ्याही गुरु असलेल्या कांबळी मॅडम यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले आज आम्हा सर्वांच्या हृदयात घर करून असलेल्या या माऊलीचे आम्ही ऋण व्यक्त करतो. सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य कांबळी मॅडम यांनी केल्याचे गौरवोद्गार काढले

You cannot copy content of this page