⚡मालवण ता.१४-: भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन मालवण बस स्थानक येथे लायन्स क्लब ऑफ मालवण तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. तहसीलदार अजय पाटणे व आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मोहिमेत बस स्थानक परिसरातील कचरा व झाडी यांची सफाई करण्यात आली.
यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष सौ. वैशाली शंकरदास, सचिव सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदार सौ अंजली आचरेकर, लायन्स सदस्य गणेश प्रभुलकर, सौ.मीना घुर्ये, उमेश शिरोडकर, महेश कारेकर, विनोद शंकरदास, सतिश वाळके, अमित शंकरदास, अमोल कामते, अनाजी गावडे, काका खोत, सुधाकर मालंडकर आदी उपस्थित होते.
