*”ते” उपोषण सुटल्याने मंगेश तळवणेकर यांनी आमदार केसरकरांचे मानले आभार

*आमदार दिपक केसरकर यांच्या शिष्टाई मुळे सुटले रवी जाधव यांचे उपोषण*

*💫सावंतवाडी दि.२५-:* व्यवसायासाठी बाजारपेठेतील ती जागा कायमस्वरूपी मिळण्यासाठी सावंतवाडी नगरपालिके समोर सुरू असलेले रवी जाधव यांचे उपोषण अखेर आज माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या मध्यस्तीने ७ व्या दिवशी सुटले आहे. हे उपोषण सुरू झाल्यानंतर माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर हे वारंवार रवी जाधव यांची विचारपूस आत्मीयतेने करत होते. अशी माहिती विठ्ठल रखमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिली असून, आमदार दिपक केसरकर यांनी केलेल्या शिष्टाई मुळे हे उपोषण संपवण्यासाठी यश आल्याने मंगेश तळवणेकर यांनी आमदार दिपक केसरकर यांचे जाहीर आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page