युवासिंधू फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

*प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत नगरपालिकेच्या महिला व पुरुष सफाई कामगारांचा होणार सत्कार

*💫सावंतवाडी दि.२५-:* हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच युवसिंधु फाउंडेशनचे सदस्य श्री सागर सोमकांत नाणोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवासिंधू फाउंडेशन च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक दुर्वा संतोष पांढरे हिने प्राप्त केला असून, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे श्रद्धा सत्यवान मडव व करुणा नारायण मोरजकर हिने प्राप्त केला आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिक अभय रामचंद्र गुरव याने प्राप्त केले आहे. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक साईक्षा विठ्ठल केळजी हिने प्राप्त केला असून, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे तेजेश शिवाजी परब व समृद्धी सुशील नाटेकर यांनी प्राप्त केला आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिक कश्मिरा भिकाजी गोठणकर हिने प्राप्त केला आहे. उद्या 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील नगरपालिका सावंतवाडी येथील सभागृहात बक्षीस समारंभ कार्यक्रम सायंकाळी 3 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या बक्षीस समारंभास सर्व सहभागी स्पर्धकांनी उपस्थित राहावे असे आवाहन फाऊंडेशन मार्फत करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून देखील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. परंतु, हि स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना नंबर देण्यात आले आहेत. तसेच इतर सहभाग स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निबंधाचे परीक्षण मान्यवर परीक्षकांनी करून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व पुरुष सफाई कामगारांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page