प्रजासत्ताक दिनी वेत्ये येथे खुल्या रस्सी खेच स्पर्धेचे आयोजन

*श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ च्या वतीने करण्यात आले आयोजन

*💫सावंतवाडी दि.२६-:* तालुक्यातील वेत्ये या गावात उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य अशा खुल्या रस्सी खेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ६०० किलो वजनी गटात होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा वेत्ये येथे हायवे सर्कल जवळ होणार असून, संध्याकाळी ठीक ४ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यावेळी कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक असणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. तर या स्पर्धेचे खास आकर्षण हे मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी व सूत्रसंचालक नितीन नाईक हे असणार आहेत.

You cannot copy content of this page