*मंगेश तळवणेकर यांनी पुकारलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे*

*💫सावंतवाडी दि.२५-:* पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित डॉक्टरांच्या मनमानी कारभाराविरुद्ध माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवनेकर यांनी पुकारलेले उपोषण त्यानी मागे घेतले आहे. त्या डॉक्टर सह पशुधन विकास अधिकारी यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.  पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित डॉक्टरांच्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषणाचा इशारा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिला होता.

You cannot copy content of this page