जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.२५-:* रोजगाराच्या दृष्टीने रेडी गावात टाटा मेटालीकच्या जागेत प्रोजेक्ट सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, आज प्रांताधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सक्षम अधिकारी देखील उपस्थित नव्हते. तसेच या प्रश्नावरून उद्या २६ जानेवारी रोजी रेडी ग्रामपंचायत मार्फत उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे एकतर रोजगार द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या जागा परत कराव्या अशी मागणी माजी आरोग्य सभापती तथा जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी केली आहे. यावेळी सरपंच रामसिंग राणे, सदस्य विनोद नाईक, आनंद भिसे, अनंत कांबळी, गफार खानापूरे, प्रभाकर राऊळ, संतोष राणे, संतोष राणे, पिंट्या राणे, पुरुषोत्तम राणे, जय राणे, गफार खान, प्रभाकर राऊळ, अनंत कांबळी, संतोष मांजरेकर,प्रथमेश इब्रामपूरकर, नितीन परब, अमित राणे आदी उपस्थित होते.
