*टेम्पो ट्रॅव्हल्स चालक मालक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या उपोषण
*💫सावंतवाडी दि.२५-:* जिल्ह्यात अनधिकृत टेम्पो ट्रॅव्हलस मधून सुरू असलेली प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील परवानाधारक टेम्पो ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी सदर कार्यालयाला वारंवार निवेदन देऊन देखील आजपर्यत योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात आली नाही आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी उद्या २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा टेम्पो ट्रॅव्हल्स चालक मालक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने देण्यात आला आहे.
