*कोणत्याही परिस्थितीत “त्या” ठिकाणी दुकान उभे करू देणार नाही

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा; जुन्या बस स्टॉप जागेची सहकार्यासह केली पाहणी*

*💫सावंतवाडी दि.२५-:* जुन्या बस स्टॉप ची जागा चुकीच्या पद्धतीने भाडे तत्वावर देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत संबंधित व्यक्तीला तेथे दुकान उभे करू देणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे. आज त्यानी जुन्या बस स्टॉप जागेची पाहणी केली, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. नगरपालिकेतील सत्ताधार्याविरोधात बबन साळगावकर यांनी आवाज उठवित जुन्या बस स्टाॅपचा विषय हाताळत होता. ही बसस्टाॅपची जागा व पर्यटन केंद्रातील गाळा कशा प्रकारे चुकीच्या पध्दतीने परप्रांतीयांना देण्यात आला याबाबत त्यानी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले होते. आज पुन्हा एकदा साळगावकर यांनी जुन्या बसस्टाॅच्या जागेवर सहकार्यासमवेत भेट देऊन पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी माजी नगरसेवक सुरेश भोगटे विलास जाधव, बावतीस फर्नांडिस,आदी उपस्थित होते. श्री साळगावकर म्हणाले या शहरामध्ये अनेक जाती धर्माची प्रांताची लोक व्यवसायाच्या दृष्टीने आली, गुण्यागोविंदाने दुधात साखर मिळावी यासारखी ते याठिकाणी व्यवसाय करत आहेत मात्र आज पालिकेतील सत्ताधारी याठिकाणी दुधात विष कालविण्याचे काम करत आहेत. शहरातील नगरपालिकेची जागा भष्ट्र मार्गाने कोणीतरी घेत असेल तर त्या जागेवर त्याला कुठल्याही प्रकारे व्यवसाय उभा करु दिला जाणार नाही तरीही त्याने धाडस केल्यास जनतेला सोबत घेऊन तो हाणून पाडू. साळगावकर पुढे म्हणाले, यापुढे शहरातील कोणीही सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून चुकीच्या पध्दतीने नगरपालिकेची जागा घेण्याचा धाडस करु नये, आम्ही अशा प्रकारे नगरपालिकेची जागा कोणाचाही घशात घालु देणार नाही, शहरातील प्रत्येक घडामोडीवर आता आम्ही लक्ष ठेऊन असुन व्यापारी वर्गाच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. परंतु चुकीच्या माणसाच्या मागे कोणी उभे राहुन चुकीचा मार्ग अवलंबत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही.

You cannot copy content of this page