परीक्षा संपन्न होण्यास सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर आणि टीमचे अमूल्य असे योगदान*
*💫सावंतवाडी दि.२४-:* येथील पंचम खेमराज लॉ कॉलेज मध्ये आज कॉल इंडिया बार एक्झाम संपन्न झाली. या परीक्षेला देशाच्या कानाकोपऱ्यातून ३०० च्या आसपास विद्यार्थी उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचम खेमराज या महाविद्यालयात प्राचार्य सौ. अश्विनी लेले व स्टाफ ने चोख व्यवस्था केली होती. या सर्वात त्यांना सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांची योग्य साथ लाभली आहे. संजू विरनोडकर आणि टीम ने यावेळी परीक्षेच्या आवारात सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करून सहकार्य केले होते. यावेळी महाविद्यालय कडून करण्यात आलेली योग्य व्यवस्था पाहून विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त करत महाविद्यालयाच्या प्राचार्या सह संजू विरनोडकर टीम चे आभार व्यक्त केले आहेत.
