शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव
उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर कायम
⚡आंबोली. ता,२७ अनिल चव्हाण-: येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सावित्री वामन पालेकर यांची निवड झाली आहे.तर उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर हे राहिले.आंबोली ग्रामपंचायत सभागृहात आज सरपंच निवड झाली.यात भाजप कडून दत्तू नार्वेकर आणि सावित्री पालेकर यांनी अर्ज भरला होता.

शिवसेनेकडून काशीराम राऊत यांनी अर्ज भरला होता.यावेळी दत्तू नार्वेकर यांनी अर्ज मागे घेतला.सावित्री पालेकर यांना ६ मते मिळाली तर सेनेचे काशीराम राऊत यांना ४ मते मिळाली.सरपंच पदी सावित्री पालेकर यांची निवड झाली.१० सदस्य मतदान साठी उपस्थित होते.निवडणूक अधिकारी विस्तार अधिकारी जी आर लोंढे आणि ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहिराम हे उपस्थित होते.उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर हे कायम आहेत.त्यांच्याकडे सरपंच पदाचा प्रभारी चार्ज होता.सरपंच निवडी नंतर भाजप पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
