बांदा माजी सरपंच अपेक्षा नाईक यांचा उपक्रम;आझादी का अमृत महोत्सव निमित्त दिली भेट
⚡बांदा ता.२६-:
घारपी (ता. सावंतवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी (कै.) दादा नाईक यांच्या स्मरणार्थ बांद्याच्या माजी सरपंचा अपेक्षा नाईक यांनी आझादी का अमृतमहोत्सव या अंतर्गत विविध मान्यवर नेत्यांच्या दहा फोटो प्रतिमा भेट दिल्यात.
घारपी हे अतिदुर्गम गाव असून येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्रीमती नाईक यांनी दिलेल्या देणगीबाबत शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका हेमलता मुळीक-मोरजकर, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.