उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.२६-: दिपक केसरकर यांनी पक्ष वाढीसाठी काय केल हे आदी जाहीर करावे ते ज्या पक्षात गेले त्या पक्षात आपल्यापेक्षा मोठा होतो त्या प्रत्येकाला स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय दृष्ट्या संपवण्याचे काम केसरकर यांनी केले. असा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की. आमदार दीपक केसरकर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दोन वेळा निवडून आले असताना केसरकर हे शिवसेनेवर कसे काय टीका करतात असा सवाल चंद्रकांत कासार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान केसरकर यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले हे तरी विसरू नये विसरू नये. जर केसरकर यांना एवढा आत्मविश्वास असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान देखील कासार यांनी केला आहे.