उभा बाजार येथे एका अपार्टमेंटमध्ये पार्किंग करून ठेवण्यात आलेली दुचाकी चोरीस

सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

⚡सावंतवाडी,ता.२४-: सावंतवाडी-उभा बाजार येथे एका अपार्टमेंटमध्ये पार्किंग करून ठेवण्यात आलेली ऍक्टिवा कंपनीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली आहे. हा प्रकार काल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला. याबाबतची खबर राबिया अमीर शेख (रा. गोवा) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख या गोवा येथे राहत असून त्या २२ जुलै रोजी उभाबाजार येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. त्यांनी आपली एक्टिवा दुचाकी एमएच ०७ एएल ८७१२ ही आपल्या अपार्टमेंटच्या खाली पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती. मात्र त्यांनी काल सायंकाळी आपल्या दुचाकीची पाहणी केली असता ती त्या ठिकाणी आढळून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली, मात्र ती त्यांना सापडली नसल्याने अखेर आज त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page