आनंदवाडी येथील हरिनाम हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ

आम.वैभव नाईक,नगराध्यक्षा साक्षी प्रभू,संदेश पारकर,सुशांत नाईक,नगरसेवक यांनी घेतले दर्शन

⚡देवगड ता.२४-: तालुक्यातील आनंदवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सप्तप्रहारांचा श्री हरिनाम सप्ताहास रविवारी सकाळी १० वाजता विधिवत घटस्थापना करण्यात येऊन गावचे पाटील ,मानकरी ,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरूवात झाली. या हरिनाम सप्ताहास शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन श्री चे दर्शन घेतले.

या वेळी त्यांच्या समवेत युवा नेते संदेश पारकर,नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक देवगड जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू,नगरसेवक निवृत्ती (बुवा)तारी, तेजस मामघाडी,संतोष तारी, विशाल मांजरेकर,सुधीर तांबे, ,महिला संघटक स्वप्नाली वाल्मिकी ,शाखा प्रमुख बाळू बांदेकर अन्य शिवसैनिक ,माजी सरपंच बाळासाहेब ढोके उपस्थित होते.या वेळी सर्वांनी श्रीचे दर्शन घेतले ग्रामस्थांनी मान्यवरांचे श्रीफळ करंजी प्रसाद देऊन स्वागत केले.

सप्ताहाच्या प्रारंभी गावातील ग्रामस्थ, यांनी हरिनामाच्या गजरात भजन करून. त्यानंतर तालुक्यातील विविध भजन मंडळे नियोजनानुसार दिवसरात्र भजन करत असतात. रात्रौ स्थानिक वाडीनिहाय . ग्रामस्थांच्याही दिंड्या निघतात. अखंड परिसर कसा भक्तिमय होऊन जातो. श्री. विठ्ठलाच्या नामस्मरणाने व गजराने तल्लीन होऊन जातात. वेगगवेगळे धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक दिंड्या व भव्य चित्ररथ केले जातात.

दुस-या दिवशी सकाळी १० वाजता ‘श्री. हरिनाम गजराची’ सांगता होते. त्यानंतर दहा अवतार दहिहंडी नंतर व दहिहंडीचा प्रसाद सर्वांना वाटला जातो.

तिस-या दिवशी दुपारी ब्राम्हण भोजन करून सर्व येणा-या भाविकांना महा प्रसाद असतो. त्यानंतर सायंकाळी श्री हरिनाम सप्ताहाच्या घटाचे वाजत – गाजत मिरवणुकीने विसर्जन केले जाते.श्री हरिनाम सप्ताहाची सांगता होते.या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने घराघरातून करंज्या प्रसाद म्हणून भाविकांना दिल्या जातात..

You cannot copy content of this page