वनसंवर्धनदिनी ५५० रोपांची लागवड

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने वनसंवर्धन दिनानिमित्त जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी ‘घनवन वृक्षलागवड‘ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिसव, खैर, आवळा, काजू वगैरे वेगवेगळ्या स्थानिक प्रजातीच्या सुमारे ५५० रोपांची लागवड करण्यात आली.

  यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, सचिन काकड, अभिषेक नेमाणे, प्रितम गायकवाड, वैभव म्हाकवेकर, अभि गिरप, पंकज केळुसकर, विठ्ठल सोकटे, निशा आळवे, श्वेता रेडकर, प्रा. गायकवाड, बॅ. खर्डेकर कॉलेजचे ५८ बटालियन तसेच नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. येणा-या कालावधीत शहरातील कंपोस्ट डेपो, वेंगुर्ला स्टेडियम तसेच इतर मोकळ्या जागा आदी ठिकाणी अडीच ते ३ हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प असल्याचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले.
You cannot copy content of this page