⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ -: मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे ३१ जुलै रोजी सांयकाळी ४.०० वाजता पावसाळी स्वरचित काव्य मैफिल कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने साहित्यिका उषा परब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्या वाचकांना पावसावर स्वरचित कविता सादर करायची आहे. त्यांनी ३० जुलैपर्यंत वाचनालयात नावे द्यायची आहेत, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात येत आहे.
