⚡आंबोली, ता.१९ अनिल चव्हाण-: पावसाच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाऱ्या आंबोलीत यावर्षी आतापर्यंत १४० इंच पाऊस झाला आहे.जगात सर्वाधिक पाऊस हा हिमालयातील मौसिंराम येथे पडतो.त्यानंतर भारतात पूर्वेकडील चेरापुंजी येथे त्यानंतर कर्नाटक येथील आगुंबे येथे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग येथील आंबोली महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो.
२०१९ मध्ये मौसिंराम येथे पाऊस कमी झाला होता तर आंबोलीत ४३५ इंच पाऊस होऊन जगात सर्वाधिक पाऊस आंबोलीत झाला होता.२०२० मध्ये ४२४ तर २०२१ मध्ये ४३९ इंच पावसाची नोंद झाली.पाऊस मोजण्याचे काम आंबोलीत भाऊ ओगले हे करीत आहेत.त्यांच्या आधी त्यांचे मामा नाथा जोशी हे करायचे.त्याकाळी आंबोलीत ४५० ते ५०० इंच पाऊस होता.त्यावेळी पावसाळी पर्यटन नसून आंबोली म्हणजे दुर्गम भाग.
भौतिक सुधारणा,लोकवस्ती,आधुनिक बदल यामुळे आता शहर झाले आहे.अलीकडच्या २५ वर्षात पाऊस ३०० ते ३५० दरम्यान असून सर्व बदल झाले आहेत.गेली ३ वर्षे पाऊस जास्त पडतो.वर्षभर पाऊस पडत आहे.आंबोलीत १ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत पाऊस मोजला जातो.मात्र पूर्वेकडे ६ महिने पाऊस पडतो आणि मोजला जातो. वर्षा पर्यटन आणि पाऊस,धुके,फेसळणारे धबधबे,शुभ्र वाहणारे ओहोळ,वारा धुक्याची उघडझाप असा थ्रील अनुभवण्यासाठी तरुणाई आणि आता सर्वच पर्यटकांना भुरळ पडत आहे.त्यामुळे इथल्या पावसाचे महत्व वाढले आहे.याठीकानाहून हिरण्यकेशी नदी उगमस्थान असून ही जिल्ह्यातील समुद्राला न मिळता पूर्वेकडे वाहत जाणारी एकमेव नदी असून कर्नाटकात जाते.
