मुख्याध्यापक मानकर;कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण
⚡सावंतवाडी ता.१९- : शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेना ( इको क्लब ) यांच्यावतीने शालेय आवारात दर वर्षाप्रमाणे याहीवर्षी वृक्षारोपण करण्यात आले. . वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक मोहन वाडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर तसेच इको क्लबचे शिक्षक एस. व्ही. भुरे, ए. जे. ठाकूर, ज्योती पावसकर, गीता सावंत, शुभांगी देवरे आदी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक एन. पी. मानकर यांनी सांगितले की, शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अलीकडे होत असलेली पर्यावरणाची ऱ्हास मानवासाठी अत्यंत घातक ठरत आहे. परिणामी आपल्याला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. म्हणूनच आपण पर्यावरण संवर्धन केले पाहिजे. यासाठी वृक्षारोपण उत्तम पर्याय आहे, असेही मुख्याध्यापक मानकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस. व्ही. भुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाकूर यांनी केले.
