सांगेली येथे कृषी माहिती केंद्र स्थापन

शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन

सावंतवाडी : सांगेली येथे उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मार्फत कृषी माहिती केंद्र हे शेतकरी व त्यांना येणाऱ्या शेतीतील समस्या यावर सुवर्णमध्य म्हणून उभारण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ म्हणाले की, शेतीस व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे.


पारंपरिक पध्दतीमुळे उत्पन्न कमी येत असल्यामुळे नवीन पध्दतींचा वापर करणे आवश्यक आहे.
एखादे नवीन पीक घ्यायचे असेल तर त्याची संपूर्ण माहिती घ्यावी, आधुनिक पद्धतीने शेतीचा कस आणि उत्पन्न कसे वाढेल? हे पाहणे.
पिकांवरील रोग, लागणारी कीड, यांची व्यवस्थित पाहणी करणे, त्यानुसार उपाय करणे तसेच माती तपासून त्यानुसार ‘खत व्यवस्थापन’ करण्याचे आवाहनही केले.
लोकांनी शेतीसाठी एवढी जमीन आहे, तर त्यांनी नवीन पध्दतीचा अवलंब केला तर गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर नक्कीच थांबेल.
कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांचे तसेच कृषी सहाय्यक अनमोल गावडे यांचे नारळ, सुपारी काजू यावरील कीड ओळख तसेच किडीवरचे नियंत्रण आणि प्रधानमंत्री, पीक विमा योजना तसेच शेतीसाठी लागणाऱ्या यंत्र व औजारासाठी अर्ज कसे व कुठे करावेत, फळबाग लागवड योजना, PMFME योजना याबद्दल समस्त शेतकरी वर्गाला करण्यात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ, कृषी पर्यवेक्षक यशवंत आप्पासाहेब गव्हाणे,
कृषी सहाय्यक अनमोल गावडे, माजी सैनिक तथा प्रगतशील शेतकरी बाबुराव कविटकर, ग्रामविकास अधिकारी कांता जाधव, विकास सेवा सोसायटी सांगेलीचे चेअरमन पुरुषोत्तम राऊळ, माजी कृषी अधिकारी सुरजी राऊळ व शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

You cannot copy content of this page