दळवी महाविद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

नाविण्यपूर्ण ‘विजिगीषु’ संकल्पने अंतर्गत विविध स्पर्धा

⚡कणकवली ता.१९-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा ८वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते सांस्कृतिक विभाग जिल्हा समन्वयक आशिष नाईक ,प्रमुख पाहुणे स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष
सुरेश तळेकर, समन्वयक, दळवी महाविद्यालय तथा प्रभारी संचालक, मुंबई विद्यापीठ उप-परिसर, सिंधुदुर्ग श्रीपाद वेलिंग हे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी चाणक्य यांची ‘विजिगिषु’ हि संकल्पना महाविद्यालयात रुजवली ‘विजिगिषु’ म्हणजे ‘जगज्येता’. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ‘विजीगिषु’ सारखे कला व संकृतीच्या जोरावर प्रेमाने जग जिंकावे, या करिता ‘विजिगिषु’ हा उपक्रम महाविद्यालयात दरवर्षी राबविला जातो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, त्यांना युथ फेस्टिव्हल मध्ये यश मिळवता यावे, म्हणून सलग पाच दिवस विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते.


आशिष नाईक यांनी विविध स्पर्धेची माहिती दिली व मिमिक्रीचे सादरीकरण केले.श्रीपाद वेलिंग “आठ वर्षापूर्वी 14 तारखेला एक रोपटे लावले होते, त्याला आता आठ वर्षे पूर्ण झाले आहेत, दळवी सरांनी ज्या विविध संकल्पना महाविद्यालयात राबविल्या आहेत, त्यांचा वारसा शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुढे चालवावा” असे ते म्हणाले.
सुरेश तळेकर “दळवी सरांनी गाव व कॉलेजसाठी बरेच केलं आहे, त्यांनी या खेडेगावात शिक्षणाची ज्ञानगंगा आणली आहे, त्यामुळेच आज ही भव्य इमारत उभी राहिली आहे, यापुढे सुद्धा सर्व कर्मचारी,विद्यार्थी प्राध्यापकांनी असेच सहकार्य करावे. असे ते म्हणाले.

या वर्षीचा ‘चाणक्य ऑफ द इयर’ पुरस्कार रोहन चव्हाण यांनी पटकावला तर ‘गार्गी ऑफ द इयर’ सुखदा पळूसुदेसाई हि ठरली.
‘विजिगीषु’ उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत.

आंतरमहाविद्यालयीन पखवाज वाद्य संगीत स्पर्धेचा निकाल.
प्रथम कु.ऋतुराज धुरी (एस के पाटील कॉलेज)
द्वितीय कु.श्रेया धुरी (एस.आर.एम कॉलेज )
तूर्तीय भावेश करंगुटकर (एसपीके महाविद्यालय),उत्तेजनार्थ-ओंकार लिंगायत
मेहंदी स्पर्धेचा निकाल- श्रुतिका पाळेकर,अलमीरा शिरगावकर, गौरी चव्हाण
यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला.
रांगोळी स्पर्धेचा निकाल- दिप्ती वारीक,सुखदा पळसुदेसाई,तेजस्विनी वारिक यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला.

भाषण स्पर्धेचा निकाल- दीपिका बांदेकर,सानिका लाड, ओंकार गुरव यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला.

गायन स्पर्धेचा निकाल- प्राजक्ता ग्रुप, निकिता शेलार, सानिका ग्रुप यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला.

नृत्य स्पर्धेचा निकाल-निकिता ग्रुप,अस्मिता कदम,साक्षी भोगाटे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला.

पोस्टरमेकिंग स्पर्धेचा निकाल-श्रुती वाडेकर,गौरी तळेकर, शितल कंजीर
यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी राणे,ओंकार गुरव यांनी केले तर आभार श्रुती वाडेकर हिने मानले.

You cannot copy content of this page