गावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणुन जनतेचा विश्वास सार्थकी ठरवणार

चिंदर ग्रामपंचायत भाजप पक्षाचे पॅनल प्रमुख नेते संतोष कोदे यांचे प्रतिपादन*

मालवण दि प्रतिनिधी विरोधकांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात चिंदर गावात विकासकामे न करता, फक्त राजकारण केले.त्यामुळे ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांविरोधात मतदारांनी असलेली प्रचंड चीड मतदान यंत्रातून व्यक्त करीत मतदारांनी भाजपच्या पॅनेलला विजयी करीत सत्ता हाती दिली येत्या काळात गावातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणून जनतेने दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरविणार आहोत असे प्रतिपादन चिंदर ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजप पक्षाचे पॅनेल प्रमुख संतोष कोदे यांनी येथे बोलताना केले गेल्या काहि वर्षात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या चिंदर ग्रामपंचायतीतही शिवसेनेची सत्ता होती. मात्र यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेला हादरा देत ग्रामपंचायतीत निर्विवाद बहुमत मिळविले. चिंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विजयश्री खेचून आणत शिवसेनेला धक्का दिला. या यशात भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, स्थानिक पदाधिकारी संतोष कोदे , संतोष गावकर आणि गाव पातळीवरील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते किंगमेकर ठरले. चिंदर ग्रामपंचायतीचा निकाल हाती आल्यानंतर भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांनी देवी माऊली आणि रामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी विजयी उमेदवारांसह धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, जि. प. सदस्य जेरॉन फर्नाडिस, प्रफुल्ल प्रभू, हडी सरपंच महेश मांजरेकर, संतोष गावकर, मनोज हडकर, प्रकाश मेस्त्री, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या एकूण ११ जागांपैकी ६ जागांवर भाजपने विजय मिळवित सत्ता काबीज केली. ११ जागांसाठी एकूण २२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. भाजपच्या ग्रामविकास पॅनेलचे चार प्रभागातून ६ उमेदवार विजयी झाले. यात प्रभाग १ मधून दीपक सुर्वे, प्रभाग २ मधून राजश्री कोदे, सानिका चिंदरकर, शशिकांत नाटेकर विजयी झाले. तर प्रभाग ३ मधून दुर्वा पडवळ व महेंद्र मांजरेकर विजयी झाले या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा झालेला विजय हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले जाणार. गावाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. रोजगार, पर्यटन, आरोग्य, रोजगार या बाबींवर काम करून जनतेला अभिप्रेत असलेला लोकाभिमुख कारभार करणार असल्याचा निर्धार यावेळी विजयी उमेदवारांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page