*💫सावंतवाडी दि.२१-:* ग्रुप ग्रामपंचायत वसोली सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलमधील प्रभाग ३ मधून वसोली हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित परब हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर वसोली हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. १५ जानेवारी रोजी वसोली ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. ७ सदस्य संख्या असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग आहेत. अजित परब हे प्रभाग ३ मधून निवडणूक लढवत होते. या प्रभागामध्ये एकूण ४४२ मते होती. त्यापैकी २८६ मते घेऊन अजित परब हे विजयी झाले. त्यामुळे विद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिक्षक दिपक तारी, यशवंत वारंग, शिक्षकेतर कर्मचारी स्नेहा गवस, दिगंबर तवटे तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
वसोली हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित परब यांचा सत्कार…
