मालोंड येथे ग्रामसेवक युनियन कडून वनराई बंधारा…

*💫मालवण दि २३-:* मालोंड टेंबवाडी वनगदा ओहोळ येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (DNE १३६) तालुका शाखा मालवण व ग्रामपंचायत मालोंड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातुन वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जी प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा प्र वि) राजेंद्र पराडकर यांनी भेट दिली. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी श्री. गोसावी, कृषी अधिकारी श्री. कांबळे, कृषी विस्तार अधिकारी व्ही के जाधव यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते. मालोंड सरपंच श्रीम वैशाली सीताराम घाडीगावकर व नवनाथ घाडीगावकर, व ग्रामस्थांनी सहकार्य केले. आभार ग्रामसेवक जाधव यांनी मानले.

You cannot copy content of this page