*भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक ओरोस येथे संपन्न

जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

*💫ओरोस दि.२१-:* भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सिंधुदुर्गची महत्वपूर्ण जिल्हा कार्यकारणीची बैठक आज श्री इच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यलय, समीर परब, ओरोस फाटा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजन तेली व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, जिल्हा सरचिटणीस बाबा परब, आनंद शिरवलकर, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब आशिष हडकर, चेतन चव्हाण, संजय नाईक तसेच सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य त्याचप्रमाणे सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस सोशल मीडिया प्रमुख उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पार्टीला मिळालेले घवघवीत यश युवा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महत्वाचे ठरले अशा प्रकारेच सातत्याने समाजाशी व तळागाळातील कार्यकर्त्यांशी बांधिलकी आणखीनच घट्ट करण्याच्या दृष्टीने व गावागावात सुरू असलेल्या बुथ रचना सक्रिय करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने युवा वर्गाचे असलेले योगदान व महत्व यावेळी मान्यवरांनी समजावून सांगितले. आत्मनिर्भर भारत च्या योजने अंतर्गत युवा पिढीला सक्षम करण्यासाठी युवा मोर्चाने पुढे यावे असे आवाहन या निमित्ताने मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले. तसेच राष्ट्रमंदीर म्हणजेच राममंदिर निर्माण निधी संकलन च्या प्रक्रियेत सुद्धा युवा मोर्चाने सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा जिल्हाध्यक्ष तेली यांनी केले. आनंद (भाई) सावंत ह्यांनी तयार केलेल्या ह्या कार्यकर्त्यांच्या फळीचे कौतुक करताना खूप दिवसांपासूनची युवा मोर्चाची जिल्ह्याची बैठक पाहण्याची ईच्छा पुर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page