शिंदे गटाचे प्रवक्ते तथा माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांचा वाढदिन
⚡सावंतवाडी ता.१८ प्रसन्न गोंधावळे: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासाचे व्हीजन घेऊन नेहमी धडपड करणारे नेतृत्व म्हणजे माजी वित्त व गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर,, आज त्यांच्याकडे कोणतेच मंत्रीपद नसतांनाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत मतदारसंघातील प्रश्नावर बैठक घेऊन त्यांना जिल्ह्याच्या जनतेची कीती तळमळ आहे हे दाखवून दिले. पालकमंत्री म्हणून कोठ्यावधीचा निधी त्यांनी आणला, अनेक विकास कामे मार्गी लावली शांत संयमी सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते.अशा या महत्वाकांक्षी नेत्याचा आज ६८ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस ग्लोबल महाराष्ट्र चॅनेलकडून शुभेच्छा..
आमदार दीपक केसरकर यांची राजकीय वाटचाल त्यांच्या होमपीचवर म्हणजेच सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली स्वीकृत नगरसेवक नगराध्यक्ष आमदार ते मंत्री चा त्यांचा राजकीय आलेख चढतच गेला. सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासामध्ये सावंतवाडी मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याची किमया कोणी केली तर ती दीपक केसरकर यांनी, मंत्री म्हणून मिळालेल्या संधीचा वापर करताना त्यांनी आपल्या कामाची छाप अख्ख्या महाराष्ट्रात पाडली, एक आदर्श मंत्री म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी ते नेहमीच धडपडत राहिले चांदा ते बांदा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून विकासाची गंगा त्यांनी गावागावात पोहोचवली कृषी, पर्यटन, मत्स्य, फलोत्पादन, महिला सक्षमीकरण आरोग्य आधी क्षेत्रात त्यांनी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला. विकास आणि तो कसा करायचा याचा परिपूर्ण अभ्यास करून त्यांनी मंत्रिपदाची पाच वर्ष पणाला लावली आधुनिक शेतीच्या माध्यमातून गावागावात यांत्रिकीकरणाची योजना पोहोचवली यातून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले त्याचा फायदा जिल्ह्यात पिकणारे ५६ हजार क्विंटल भात ८६ हजार क्विंटल वर पोचले. महिलांना स्वयंपूर्णतेचे धडे देताना रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले मात्र हे करत असताना केसरकर यांनी कधीच पक्षीय भेदभाव केला नाही पक्ष विरहित काम करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला.
आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात शांत आणि संयमी राजकारण केले त्यांचे कार्यकर्ते घडवण्याची पद्धत ही साधी आणि सोपी होती त्यांच्या कामाची पद्धत व त्यांच्या स्वभावाला पाहूनच अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबतही त्यांनी राजकीय वैरत्व घेत त्यांच्याविरुद्ध लढाई दिली यात ते यशस्वी ही झाले. मात्र हे करत असताना आपली लढाई ही वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे असे ते नेहमी म्हणाले.
आमदार दीपक केसरकर राज्यातील शिंदे सरकार मध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत.हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही शिंदे सोबत शिवसेना सोडली असे त्यांचे म्हणणे आहे.मात्र आजही आपण शिवसेनेतच असून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या बद्दल आपणाला आदर असल्याचे सांगतात. मात्र गेल्या महिन्याभरात शिंदे गटाच्या बाजूने त्यांनी मांडलेली भूमिका संपूर्ण देशाने पाहिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी आणि केसरकर यांच्यावर असलेला विश्वास पाहता केसरकर यांचे आणि मुख्यमंत्री यांचे जवळचे नाते असल्याचे दिसून येते, सावंतवाडी मतदारसंघातील रेंगाळलेले महत्त्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कालच मुख्यमंत्री यांनी घेतलेली बैठक याचे उदाहरण आहे.
त्यामुळेच लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केसरकर यांच्या गळ्यात महत्त्वाची कॅबिनेट मंत्रीपदाची माळ निश्चितच पडेल यात काडी मात्र शंका नाही.
