⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहरातील पोलीस पाटील पद गेली चार वर्षे रिक्त असल्याने कणकवली शहरातील नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
सध्या कणकवलीतील नागरिक शैक्षणिक दाखले ,शासकीय दाखले तसेच नगरपंचायत महत्त्वाच्या कामांसाठी प्रामुख्याने पोलीस पाटील दाखला लागतो पण गेली चार वर्ष कणकवली पोलीस पाटील पद हे रिक्त असल्याने कणकवलीतील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.कणकवली पोलीस पाटील प्रकाश जाधव यांचे निधन झाल्यानंतर बरीच वर्ष झाली तरी कणकवली पोलीस पाटीलपदी अजूनही कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही.तात्पुरता पर्याय म्हणून कलमठ पोलीस पाटील यांच्याकडे कणकवलीचा चार्ज देण्यात आला आहे. पण कणकवलीतुन कलमठमध्ये जाणे येणे तसेच पोलीस पाटील जर भेटले नाही तर हेलपाटे मारणे यात नागरिकांचा वेळ वाया जाऊन आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर कणकवलीसाठी पोलीस पाटील मिळावा अशी कणकवली शहरवासीयांची मागणी आहे.
