सावंतवाडी पत्रकार मुलांचा उद्या सत्कार

पत्रकार संघाचे आयोजन;सकाळी ११ वाजता आर पी डी हायस्कूल येथे आयोजन

⚡सावंतवाडी ता.१६-: तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा रविवार 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आर पी डी हायस्कुल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा पत्रकार संघावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान चे विक्रांत सावंत व भोसले पोलिटेक्निकचे अच्युत सावंत -भोसले हे विद्यार्थ्यांना दहावी / बारावी नंतर पुढे काय? या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकासभाई सावंत हे आहेत तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पाल्यांच्या कौतुक सोहळ्या ला उपस्थित रहावे, असे आवाहन
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page