*अज्ञात चोरट्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल*
*💫सावंतवाडी दि.२०-:* माजगाव नाला इथे एका बंद घरात चोरी झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. घरातील किंमती कपडे, विविध धातूंची भांडी असा एकूण ४,८०० रुपयाचं ऐवज चोराने चोरून नेला आहे. याबाबत सुनीता होडावडेकर यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माजगाव नाला इथे सुनीता होडावडेकर ( वय ७२ वर्ष) यांचे घर असून, त्या चराठा येथे तेरेजीन डिसोजा यांच्या घरी घरकाम आणि घराच्या देखभालीसाठी ते व त्यांचा नातू गोरक्ष होडावडेकर ( वय १४ वर्ष) हे लॉक डाऊन पासून राहत असून, २२ मार्च २०२० पासून १९ जानेवारी २०२१ या मधील कालावधीत चोरी झाली असून, घरातील कपाटातील साड्या, तसेच स्टील, ॲल्युमिनियम, पितळ, तांबे या धातूंची भांडी चोरीस गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी त्वरित सावंतवाडी पोलिस स्थानकात येऊन अज्ञात चोरा विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
