सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा कणकवली येथे संपन्न…

*💫कणकवली-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा कणकवली येथे हॉटेल अनंत मध्ये पार पडली.अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे प्रभारी प्रदीप सिंढवा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शंभूराजे देसाई महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव निखिल कांबळे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर कणकवली तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत कणकवलीत तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यावेळी किरण टेंबुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी म्हणाले की जिल्हा युवक काँग्रेस जोमाने वाढविण्यात येईल आजच्या उपस्थितीवरून युवक कांग्रेस वाढत आहे असं दिसून येत आहे. प्रदीप सिंढव साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना केंद्रातील मोदी सरकार जे काही निर्णय घेत आहेत हे युवकांसाठी व पुढील पिढीसाठी घातक आहे आज दिवसेंदिवस वाढत असलेली बेरोजगारी सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तू यांचे वाढलेले भाव शेतकरी गेले दोन महिने दिल्लीच्या बोर्डवर करत असलेले आंदोलन पितृ पेट्रोलची दरवाढ हे देशाच्या भवितव्यासाठी धोक्याच आहे हे ओळखून युवकांनी यांच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर शंभूराजे देसाई निखिल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष निलेश तेली देवगड एन एस यु आय तालुकाध्यक्ष सुरज घाडी किरण हळदणकर निखिल तारी आणि असंख्य युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page