शिवसेना नेते विशाल सावंत यांची भाजपवर टिका*
*💫सावंतवाडी दि.२०-:* नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आर्थिक दृष्ट्या मतदारांना भुलवून तसेच कोलगाव येथे भानामती सारखे प्रकार करून सावंतवाडी तालुक्यात विजय मिळवला असल्याचा दावा शिवसेनेचे विशाल सावंत यांनी व्यक्त केला आहे. जो हुकुमशाही प्रकार सावंतवाडी शहरात सुरू आहे. तसाच हुकूमशाहीचा प्रकार आता भाजप ज्या ज्या ग्रामपंचायतीत विजयी झाले आहेत. त्या ठिकाणी पाहायला मिळेल इतके निश्चित आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या काळात शहरात तसेच तालुक्यात जो शांतपणा होता. त्यांचे रूपांतर आता दहशतीत बदलेल असून, हुकूमशाही राजवटीकडे तालुक्याची वाटचाल सुरू आहे. असे सावंत म्हणाले आहेत.
