शिक्षणा बरोबर पाल्यांच्या शारीरिक सक्षमतेकडे लक्ष दिले पाहिजे

पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे पालकांना आवाहन

⚡सावंतवाडी ता.०४-: स्वसंरक्षण आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असायला हवे .शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमाबरोबर पालकांनी पाल्यांच्या शारीरिक सुदृढ च्या दृष्टीने शालेय जीवनापासूनच त्यांना कराटे क्रीडा आधी चे प्रशिक्षण साठी पाठवायला हवे. त्यातून आजची तरुण पिढी सुदृढ आणि सक्षम बनेल असे मत सावंतवाडी चे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी व्यक्त केले.ओकिनावा गो जू कान कराटे मार्शल आर्ट. असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी कळसुलकर हायस्कूलमध्ये कराटे मध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत मुलांचा गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा बॉडी बिल्डर असशांचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत योगा अभ्यासक प्राध्यापक सुभाष गोवेकर अध्यक्षस्थानी कॅप्टन एस सी दुराई प्रशिक्षक माजी सैनिक दिलीप राऊळ आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page