असलदे येथील रस्ता ४८ तासात सुरळीत करा…

अन्यथा संबंधित विभागाच्या कार्यालयाला टाळे;असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिला इशारा

*💫कणकवली दि.२०-:* देवगड निपाणी महामार्गावर असलदे येथे सदर रस्ता ४८ तासात सुरळीत न केल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिला. नांदगाव देवगड मार्गावरील असलदे ते कोळोशी दरम्यानचे अवघ्या दोन कीलोमीटरचे रस्त्याचे नुतनीकरण काम दोन महिने झाले तरी संपेना.बोगस कामाचा कळस गाढलेले हे काम सध्या जोरदार चर्चेत आहे.डांबराचा अमृता सारखा शिडकावा करुन सुरू असलेले बी एम एम पुढे काम सुरू असतानाच मागून रस्त्याला पडत जाणारे खड्डे, अपघातास निमंत्रण देणारी रस्त्यावर टाकलेली खडी यामुळे नागरिक व वाहणचालक पुरते त्रासलेले आहेत.आता अजून किती दिवस हे काम चालणार याबाबत प्रश्र्न आहे. असलदे डामरेवाडी ते आयनल फाटा येथील रस्त्याचे नुतनीकरण काम गेल्या वर्षी पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे रखडले होते.पावसाळा संपल्यावर काम सुरू होता होईना त्यानंतर असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वृत्तपत्रांनी प्रश्र्न उचलून धरल्यावर कामाला सुरुवात झाली.सुरवातीला मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.मात्र हे काम सुरू असतानाच कामगार पळून गेले.आणि तोपर्यंत लहान खड्यांनी बाळसं घेतलं.सुमारे पंधरा दिवसांनी दुसरी कामगारांची फळी आली पुन्हा एकदा बीएम एमचे पॅचवर्क सुरू झाले.दोन ते तीन दिवसांनी हीसुद्धा फळी पळाली.आणि पुन्हा काम बंद झाले.काही दिवसांपूर्वी तिसरी फळी गेली मात्र स्थानिक आणि जागरूक युवा वर्गाने विरोध करत ही अंथरलेली खडी काढायला लावली. बाकी काहीही असो पण हे रेंगाळलेले आणि अपघातास निमंत्रण देणारे,घटीया दर्जाचे काम बंद करून दर्जेदार काम होण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी थोडा वेळ काढावा आणि दोन कीलोमीटरचे दोन महिने सुरू असलेले काम पुर्णत्वास न्हावे.अशी सर्वसामान्यांची ईच्छा आहे. देवगड निपाणी महामार्गावर असलदे येथे सदर रस्ता ४८ तासात सुरळीत न केल्यास संबंधित देवगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे . सदर काम अर्धवट सोडून गेल्याने रस्त्यावर खडी हातरलेली जैसे थे आहे यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे व वाहनांतून अपघात होत आहे.१० ते १२ दुचाकी वाहन अपघात झाले असल्याचे असलदे सरपंच यांनी सांगितले ३१ जानेवारी रोजी असलदे पिर बाबांचा उरूस भरतो या आदी काम करण्याची मागणी केली आहे

You cannot copy content of this page