*पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे २९ जानेवारीला आयोजन

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आयोजन*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने २९ जानेवारी २०२१ रोजी पोलीस परेड मैदानावर पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पत्रकार नेहमी व्यस्त असतो. त्यांना आपल्या गुणांकडे लक्ष देता येत नाही. मात्र, क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना विरंगुळा मिळावा म्हणून मुख्यालय पत्रकार संघाने सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रक्कम रुपये ५ हजार ५५५ व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघास ३ हजार ३३३ रुपये बक्षीस व आकर्षक चषक दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकविर अशी वैयक्तिक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक तालुका संघाने सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे. सहभागी पत्रकार खेळाडू हा जिल्हा पत्रकार संघाचा सभासद असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष संदीप गावडे(९४२३३०१४७३) उपाध्यक्ष नंदकुमार आयरे(९४०३०५४०९७) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हा भरातील पत्रकार एकत्र यावेत त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने हे क्रिकेट सामने आयोजित केले आहे. पत्रकार संघाने पत्रकारांसाठी पुढाकार घेतलेला हा पहिला कार्यक्रम आहे. गतवर्षी त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील पत्रकारांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने शहरी आणि ग्रामीण पत्रकार एकत्र आले होते. त्यामुळे दुसऱ्या वर्षी मुख्यालय पत्रकार संघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यानिमित्त एक स्नेह मेळावा संपन्न होईल व क्रिकेट स्पर्धेचा आनंद ही पत्रकार सभासदांना घेता येईल असा प्रयत्न मुख्यालय पत्रकार संघाचा आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका संघाने आपला सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page