सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; बुवा अभिषेक शिरसाठ यांचे संगीत भजन होणार…
*💫कणकवली दि.२०-:* कणकवली तालुक्यातील आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा २१ जानेवारी २०२१ रोजी सालाबाद प्रमाणे जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुवा अभिषेक शिरसाठ यांचे सुस्वर संगीत भजन व आंब्रड येथील देवी भगवती ढोल पथकाचे “ढोल वादन” खास आकर्षण असणार आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७ वाजता नित्यपूजा, दुपारी ३ वाजता माहेरवाशीण ओठी भरण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता श्री देवी भगवती ढोल पथक आंब्रड यांचे ढोल वादन, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने,रात्रौ १० वाजता कोटेश्वर प्रसादिक भजन मंडळ हरकुळ खुर्द बुवा अभिषेक शिरसाट यांचे सुस्वर संगीत भजन, रात्री १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचे महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग “वत्सलाहरण” होणार आहे. तरी भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गांगो-भैरी देवस्थान समितीआशिये यांच्या वतीने करण्यात आले आहे.
