⚡मालवण ता.०१-: राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मालवण रोटरी क्लब आणि मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या प्रांगणात राेटरी क्लब मालवणचे माजी अध्यक्ष राे. उमेश सांगाेडकर व प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी रो. उमेश सांगोडकर आणि प्राचार्या उज्वला सामंत यांनी सर्वांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच IQAC समन्वयक प्रा. बी. एच. चौगुले यांनी कृषी दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच आज डॉक्टर्स डे असल्याने डॉक्टारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास राेटरीचे अभय कदम, पंकज पेडणेकर, सुहास ओरसकर, महेश काळसेकर, अजय जाेशी, साेनल पालव, संजय पेंडुरकर तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विद्याशाखांचे सर्व विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
