डॉक्टर्स डे निमित्ताने आझादी का अमृत महोत्सवांतर्गत दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सवांतर्गत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी आणि सावंतवाडी येथील संजिवनी बाल रुग्णालयातील डॉ. मिलींद खानोलकर यांना प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गोरुले, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. ललित तांबे उपस्थित होते.

You cannot copy content of this page