पंचम खेमराज महाविद्यालयात बजावली सेवा;खेमसावंत भोसले यांनी दिल्या शुभेच्छा
⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी चे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवाजी पाटील हे आपल्या नियत वयोमानानुसार निवृत्त झाले त्यांनी महाविद्यालयामध्ये ३३ वर्ष सेवा केली .अर्थशास्त्र विभागाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता .कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन होते पतसंस्थेला त्यांनी ‘अ ‘ दर्जा प्राप्त करून दिला.
त्याचबरोबर मराठी विभागप्रमुख डॉ मोहन चौगुले हेसुद्धा महाविद्यालयातून निवृत्त झाले त्यांनी ३१ वर्ष महाविद्यालयांमध्ये सेवा केली. नियत वयोमानानुसार ते निवृत्त झाले .प्रा. शिवाजी पाटील व डॉ.मोहन चौगुले यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले . सावंतवाडी चे प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील , संस्थेचे संचालक प्रा. डी.टी देसाई, अॅड शामराव सावंत, डॉ सतीश सावंत ,श्री जयप्रकाश सावंत , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल , प्राध्यापक शिवाजी पाटील व डॉ मोहन चौगुले यांचे नातेवाईक आप्तेष्ट, कुटुंबीय तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.