डोंगर खचण्याची भिती;तालुकाप्रमुख रुपेश राऊळ हे होते उपस्थित
⚡सावंतवाडी ता.०१-: शिरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगर खचण्याची शक्यता असून, तेथील 48 घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याबाबत कोणतीही कारवाई महसूल विभागने न करता स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत.
यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि प्रशांत कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात जात तहसीलदार मनोज मुसळे यांना जाब विचारला आहे.