काळसे बागवाडी मारहाण प्रकरणी तीघांची सशर्त जामीनावर मुक्तता

*💫मालवण दि.१९-:* काळसे-बागवाडी येथील सुधीर खोत यांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या काळसे येथील संशयित अमृत सुधाकर नार्वेकर, प्रशांत अरुण मिठबावकर, आनंद रामा तोरसकर या तिघांनाही पोलीस कस्टडीची मुदत संपल्याने मालवण न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता प्रत्येकी १५ हजार रूपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भानुप्रताप चव्हाण यांच्यासमोर हि सुनावणी झाली. संशयीत यांच्यावतीने अॅड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले. याप्रकरणी फिर्यादी सुधीर खोत यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अटकेची कारवाई करण्यात आली होती. आज पोलीसांनी संशयीत आरोपाRना पुन्हा पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र बचावपक्षातर्फे अॅड. पई यांनी केलेला युक्तीवाद लक्षात घेता न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. आणि प्रत्येकी १५ हजार रूपयांचा जामीन मंजूर केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर करीत आहेत.

You cannot copy content of this page