कास माऊली मंदिरात उद्यापासून तीन दिवस धार्मिक कार्यक्रम….

*💫बांदा दि.१९-:* कास येथील श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थान येथे बुधवार २० ते शुक्रवार २२ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० व २१ रोजी देवस्थान शुद्धी व कलावर्धन यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. शुक्रवार २२ रोजी सकाळी लघुरुद्राभिषेक, होमहवन, श्री देव कळसावर धार्मिक विधी, ओटी भरणे व दुपारी महाप्रसाद होईल. रात्री ८.३० वाजता दशावतार नाटक होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन कास ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page