बापूभाई शिरोडकर आदर्श डॉक्टर पुरस्काराने बागायत येथील डॉ. श्री. संजय खोत सन्मानित

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने आयोजन

*💫मालवण दि.१९-:* समाजसेवेच्या ध्येयाने प्रेरीत झालेली माणसे ख-या अर्थाने समाजाला आदर्श असतात. डॉक्टर संजय खोत यांच्या रुपाने पंचक्रोशीला खरा देवदूत लाभला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेली रुग्णसेवा ही फार महान आहे असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर यांनी येथे बोलताना केले. बॅ. नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यातिथीचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘बापूभाई शिरोडकर आदर्श डॉक्टर पुरस्कार’ मालवण तालुक्यातील माळगाव – बागायत येथील डॉ. श्री. संजय खोत यांना श्री. बाबूकाका अवसरे व सेवांगण मालवणचे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे, कार्यवाह श्री. लक्ष्मिकांत खोबरेकर, सेवांगण कट्टाचे अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर, श्याम पावसकर, श्री. दीपक भोगले, श्री. उमेश गाळवणकर, श्री. नितीन वाळके, ॲड. देवदत्त परुळेकर, श्री. बाबूकाका अवसरे, श्री. उमेश गाळवणकर, श्री. विवेक नेवाळकर, श्री. बापू तळावडेकर,श्री. गंगाराम गावडे, श्री. विकास म्हाडगुत, श्री. संजय आचरेकर, श्री. मनोज गिरकर, श्री. प्रकाश कुशे, मंगल परुळेकर, शैलजा पाटील, श्री.पूर्णानंद नाडकर्णी, श्री. विजय सावंत, श्री. अरुण भोगले, सौ. प्रतिभा खोत, श्री. रोहन बोवलेकर, सेवांगण मालवणचे पदाधिकारी, कट्टा पंचक्रोशी व बागायत पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी थोर संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त दीपप्रज्ज्वलन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर सेवांगणचे कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे यांनी प्रास्ताविक केले तर श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी डॉ खोत यांचा परिचय करुन दिला. असरोंडी हायस्कूलचे संस्था अध्यक्ष श्री. विजय सावंत यांनी बापूभाई शिरोडकर यांच्या आठवणीना उजाळा देणारे प्रसंग कथन केले. यावेळी सेवांगण कट्टाचे अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांनी वैद्यकिय व्यवसाय हा केवळ उपजिविकेसाठी नसून ते एक रुग्णसेवेचे पवित्र कार्य आहे. समाजसेवेचे एक व्रत आहे. डॉक्टर खोत यांनी रुग्णसेवेचे, आपल्या कर्तव्यावरील अविचल निष्ठेचे आणि ह्रुदयातील माणुसकिचे जे मनोज्ञ दर्शन घडविले, ते ख-या अर्थाने समाजाला आदर्श ठरले आहे असे सांगितले सत्काराला उत्तर देताना डॉ श्री. संजय खोत यांनी ग्रामीण भागात रुग्णसेवा करणा-या माझ्यासारख्या एका डॉक्टरला बापूभाई शिरोडकर पुरस्कार देउन माझा सन्मान केलात, त्याबद्दल मी धन्य झालो आहे. माझ्या वडिलांनी दाखविलेला समाजकार्याचा मार्ग, कुटुंबाची साथ, जनतेचे आशीर्वाद व अध्यात्माची आवड यांच्या साथीने हे डॉक्टरी पेशाचे व्रत जोपासताना समाधान वाटत आहे. कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना वैद्यकिय सेवा मिळाली पाहिजे या एकाच भावनेने मी या कठिण काळातही सेवा सुरु ठेवली. माझा स्वत:वर असलेला विश्वास व ईश्वरावर असलेली भक्ती यामुळे निश्चिंतपणे मी हे काम करु शकलोअसे सांगितले याच कार्यक्रमाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेने घेतलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेट्वस्तू देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले.

You cannot copy content of this page