अहमदनगरच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तपदी श्रीकांत वारुंजीकर

⚡मालवण ता.२५-: राज्य शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यविकास मंत्रालया अंतर्गत येत असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागात अहमदनगर येथे सहाय्यक आयुक्तपदी श्रीकांत वारुंजीकर यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. हे प्रथम वर्ग प्रशासकीय अधिकार्‍याचे पद आहे.

वारुंजीकर मूळचे सातारा येथील असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून मत्स्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांनी बुलढाणा, चंद्रपूर, अलिबाग, मुरुड, बागमांडला (जिल्हा – रायगड), मालवण-सिंधुदुर्ग तसेच सातारा आणि सांगली (अतितिक्त कार्यभारासह) मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून काम केले आहे. निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाच्या चळवळीतही त्यांनी काम केले असून अनेक वर्षांपूर्वी झालेल्या ‘पश्चिम घाट वाचवा’ या मोहिमेतले ते सक्रीय सदस्य होते.
सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने श्रीकांत वारुंजीकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page