तळवडे येथील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

⚡बांदा ता.२४-: इंग्लिश मिडीयम स्कुल तळवडे येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रत्यक्षिके सादर केली

प्रशाळेच्या शिक्षिका सौ. स्वप्नाली तांबे यांनी यावेळी योगाचे महत्व विषद केले. क्रीडा शिक्षक वसंत सोनुर्लेकर यांनी विविध योगासने व बारा सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता मयेकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक अजय बांदेकर, शिक्षिका सौ दिक्षा नाईक, अंकिता पालकर, दर्शना देसाई, श्रिया माणगावकर, प्रियांका रेडकर आदी उपस्थित होते. प्रशाळेच्या संचालिका मैथिली नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page