सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव
ठाकरे यांच्या पाठीशी

अरुण दुधवडकर:आदेश प्राप्त होताच आम. दिपक केसरकर यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका दिसेल

⚡कणकवली ता.२४-: शिवसेना मवाळ झालेली नाही आणि होणारही नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.आम. दिपक केसरकर यांच्याबाबत अद्याप पक्षप्रमुखांकडून कोणतेही आदेश नाहीत मात्र त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच त्यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका आपणाला दिसून येईल असा इशारा शिवसेना जिल्हा सपंर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी दिला

कणकवली येथील विजयभवन येथे पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा सपंर्कप्रमुख अरूण दुधवडकर बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत यावेळी आमदार वैभव नाईक , शिवसेना नेते सतीश सावंत , संदेश पारकर , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , महिला आघाडीच्या निलम पालव , जान्हवी सावंत,शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, हर्षद गावडे ,राजू शेट्ये,रुपेश राऊळ,मंगेश लोके,बाबुराव धुरी,शब्बीर मण्यार,शेखर राणे,राजू राठोड आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आजच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत संपुर्ण जिल्ह्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले .असे सांगताना अरुण दुधवडकर म्हणाले,
कणकवली येथील विजयभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना श्री . दुधवडकर म्हणाले , आता आपण जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली . सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेसोबत ठामपणे आहेत . त्यामुळे जे गेले ते कावळे व राहिले ते मावळे. शिवसेना खंबीर आहे त्याच ताकदीने पक्षप्रमुखांच्या पाठीशी आहे . आम.वैभव नाईक यांचेही आपण कौतुक करतो. त्यांनी वर्षावर शिवसेना आमदारांसाठी जे काम केले तसेच पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठामपणे राहिले , हे अभिमानास्पद आहे . सावंतवाडी मतदारसंघही शिवसेनेच्या पाठीशी आहे दीपक केसरकर गेले म्हणून काही फरक पडत नाही . शिवसेना कुणाच्याही विरोधात मवाळ नाही . गेले ते आमदार परत येतील असे वाटते , त्यात दिपक केसरकर यांनाही अजून यायचे असेल तर त्यांनी यावे मात्र , अद्याप पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर कारवाईबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही . अथवा त्यांना नोटीसही काढलेली नाही . त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू , असे श्री . दुधवडकर म्हणाले सावंतवाडी मतदारसंघातील जनता शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी आहे , हे दाखविण्यासाठी आम्ही सोमवारी एकत्र येत असल्याचेही श्री दुधवडकर म्हणाले . एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यात शिवसैनिक आक्रमक दिसत आहेत आज कोल्हापूर येथेही भव्य मोर्चा काढला . तशीच भूमिका दिपक केसरकर यांच्याबाबत असेल ते आल्यानंतर काय ते पाहू मात्र कुणी गेले म्हणून शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही . काही आमदार गेले पण शिवसैनिक आमच्यासोबतच आहेत , असेही श्री दुधवडकर म्हणाले .
आ.वैभव नाईक म्हणाले,आ. दीपक केसरकर यांची भूमिका स्पष्ट होऊदेत मग आम्ही ठरवू. आम्हाला दिशा समजत नाही.१०० टक्के पडसाद दिसतील,जिल्ह्यात शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे.

You cannot copy content of this page