⚡सिंधुदुर्ग दि.२३ प्रसन्न गोंदावळे-: कोकणवासियांच्या प्रश्नासाठी पोटतिडकीने आणि तेवढ्याच आक्रमकतेने आवाज उठविणारे युवा नेतृत्व म्हणजे आमदार नितेश राणे. आपल्या अभ्यासू वृत्तीने सभागृह हलवून सोडणारे नितेशजी राणें याचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला हा धावता आढावा
नितेशजीच्या अभ्यासू वृत्तीचं अनेकदा मोठ्या नेत्याकडून कौतुकही झालंय. कोकणाचा कोणताही प्रश्न मांडताना, ते तडीस नेताना एक वेगळी तळमळ नितेश राणे यांच्यात कायमच दिसते.
मनावर घेतलेली गोष्ट तडीस नेल्याशिवाय स्वस्थ न बसणे हा त्याचा स्वभाव. आक्रमक स्वभावाला अभ्यासाची जोड देऊन कोणतीही समस्या सहज सोडविण्याची ताकद त्याच्या अंगी जन्मतःच बाणली आहे. गरज पडेल तेव्हा आक्रमकपणा आणि यामुळेचं भलेभले नितेश राणेंना दचकून असतात ते यासाठीचं….
महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही असो, चर्चेत नाव मात्र असत ते राणे कुटुंबीयांचं. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा महाराष्ट्राच्या राजकरणात वेगळा दरारा आणि पगडाही तेवढाच मजबूत आहे…आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ताकत आ. नितेश राणेंनी आपली वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केलीय….
नारायण राणेंसारखीचं
जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सामान्य कोकणवासियांवर संकट आल्याच कळल्यास तिथे पोहचणार आणि धीर देणार पाहिलं नाव असत ते नितेश राणेंच. संकट कोणताही असो आपला नेता या संकटाला पुरून उरणार हा दृढ विश्वास सामान्य कोकणी माणसात नितेश राणेंबद्दल दिसून येतो…असा विश्वास निर्माण करण हे सहज वातट तेवढ सोप नाही…आणि हा विश्वास एका दिवसात निर्माण झाला नाही…. यासाठी पायाला भिंगरी लावून, जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढावा लागतो…आणि सामान्यांच्या वेदना जानून घ्याव्या लागतात…आणि वडील नारायण राणेंच्या पावलावर पाऊल टाकत नितेश राणे अविरतपणे ते करत आलेत…
नारायण राणेंनी केलेल्या कामाचे आशीर्वाद नितेश राणेंना कोकणी जनता देतचं आलीय…मात्र, त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी, तरुण आणि अबाल वृद्ध यांच्या हृदयात आपलेपणा निर्माण करण्याची किमया नितेश राणेंनी साधलीय…एरवी कणखर आक्रमक वाटणारा हा युवा नेता, सामन्य कोकणी माणसाच्या वेदना कळताचं हळवा होतो…हे नितेश राणेंच वेगळेपण आहे… ते अनेकांनी अनुभवलंय… या युवा नेत्याला …..
