⚡देवगड ता.२२-: टेंबवली गावचे माजी पोलीस पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व गावाचे जेष्ठ नागरिक श्रीपत जाधव व टेंबवली गावाच्या ग्रामसेवक पदावर प्रशासकीय बदलीनुसार नवीन रुजू झालेले ग्रामसेवक एच. बी. तेरसे या दोघांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
महात्मा गांधी तंटामुक्त समिती टेंबवलीची सभा आयोजित करण्यात आली.सदर वेळी ग्रा.पं. सरपंच हेमंत राणे, उपसरपंच स्नेहल घाडी, ग्रा.पं. सदस्य शेखर धुरी, शशिकांत जाधव, सुधा चेंदवणकर, संजना राणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन
गुरव, पोलीस पाटील मुकेश पारकर, सर्व तंटामुक्त समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीपत धोंडू जाधव यांनी १२ वर्षे पोलीस पाटील व ३ वर्षे तंटामुक्ती समिती अध्यक्षपद
भूषवून गावाला मार्गदर्शन केले. गावाची सेवा केली आणि अजूनही करत आहेत. या कार्यामुळेच त्यांचा
हा सत्कार करण्यात आला आहे.
.
